बार्शी : देवगाव येथील पाटील परिवाराच्या वतीने नूतन विधान परिषद आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांचा बार्शी येथील ग्रामदैवत श्री भगवंत मंदिरात खास पुणेरी पगडी व उपरणे घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी पाटील परिवारातील दोन पिढ्यांचा जिव्हाळ्याचा स्नेह अनुभवायला मिळाला. कार्यक्रमास राऊत गटाचे मार्गदर्शक रामेश्वर बप्पांच्या हस्ते रामेश्वर पाटील, पुणे येथील तेल व्यापारी प्रदीपकुमार पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. अतुल पाटील, ॲम्पिमेक्स एक्सपोर्टचे सर्वेसर्वा अमोल पाटील तसेच अभिषेक पाटील उपस्थित होते.
उपस्थितांनी आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांना विधान परिषद सदस्यपदाबद्दल अभिनंदन करून भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पुणे येथे बार्शीकरांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांनी पाटील परिवाराशी असलेल्या पिढ्यान्पिढ्यांच्या स्नेहसंबंधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.