ठाण्याच्या खाद्यविश्वात अनेकानेक नांवे आहेत पण पिढ्यानपिढ्या ओळखले जाणारे एक चविष्ट नांव म्हणजे देशमुख फास्ट फूड ! आणि त्याला कारणही तसेच आहे. इतकी वर्षे झाली तरी आमच्या पदार्थांची न बदललेली चव ! चवीच खाणार त्याला "देशमुख" देणार असं जर जुन्या म्हणीत बदल करून म्हटलं तर ते लोकांना नक्कीच आवडेल. आज असलेले आजी आजोबा आमच्या सर्वच खाद्य पदार्थ्यांच्या न बदललेल्या चवीचा आवर्जून उल्लेख करून थांबत नाहीत तर त्यांच्या नातवाला आणि नातीला सुद्धा आमच्याच सेंटर वरून वडापाव, भजी आणि ब्रेड टोस्ट आणायला पाठवतात ! मंडळी आता या तरुणाईला सुद्धा आमच्याच पदार्थांची "चविष्ट चटक" लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये ! आणि ही अतिशयोक्ती नाही बरं कां मंडळी कारण म्हणूनच आज अभिमानाने मला सांगावं असं वाटतं की स्विगी आणि झोमॅटोवरील टॉप ३ च्या आघाडीच्या आउटलेट्समध्ये देशमुख फास्ट फूडचे नांव गणले जाते !
दुसरं असं की आजच्या सिनिअर सिटीझनच्या पिढी मध्ये “पौराणिक आउटलेट” म्हणून ओळखले जाणारे देशमुख फास्ट फूड चव, विश्वास आणि सातत्य या शब्दांचे जणू समानार्थी शब्दच बनले आहेत !
श्री. चंद्रकांत देशमुख यांनी अत्यंत मेहनतीने ८ एप्रिल १९९० रोजी स्थापन केलेल्या देशमुख फास्ट फूडने आपला व्यवसाय एकही दिवस बंद न ठेवता गेली ३६ गौरवशाली वर्षे लोकांच्या पोट पूजेची व्यवस्था ही एक प्रकारे सार्वजनिक सेवेतील १००% सेवेचा एक अत्यंत दुर्मिळ असा विक्रम आहे ! आज चंद्रकांत देशमुख यांचा हा वारसा देशमुख कुटुंबाची दुसरी पिढीतील तरुण नेतृत्व उमेश देशमुख समर्थपणे पुढे नेत आहेत !
कोणत्याही ठाणेकराला विचारा, तुम्हाला ती प्रसिद्ध ओळ ऐकायला मिळेल: "ठाण्यात येऊन देशमुखचा वडा पाव नाही खाल्ला तर काय खाल्लं ?" हे आउटलेट वडा पाव, समोसा, मिसळ पाव आणि इतर अनेक स्नॅक्ससाठी प्रसिद्ध आहे, ज्यांनी केवळ ठाण्यातच नव्हे, तर जगभरात लोकांची मने जिंकली आहेत. आता तर लंडन, न्यूयॉर्क, सिंगापूर आणि इतर देशांमध्ये राहणाऱ्या अनेक ठाणेकरांना देशमुखच्या स्नॅक्सच्या चवीची आठवण येते आणि ते आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना विमानाने देशमुखचा वडा पाव पाठवण्याची विनंती करतात म्हणजे बघा ! इतकी तीव्र इच्छा फक्त आणि फक्त परदेशातून कधीतरी ठाण्यात आल्यावर आमच्या वडापावच्या कायम आठवणीत राहणाऱ्या चावीचीच असते हे आपण सुद्धा मान्य कराल ! आणि हे खरोखरचं आमच्या सर्व पदार्थांच्या चवीला आपल्याच भारतीयांनी परदेशात राहून दिलेली एक प्रकारची
मानवंदनाच म्हणावी लागेल !
देशमुख फास्ट फूडला त्यांच्या स्पर्धकांपेक्षा वेगळे ठरवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत ! म्हणजे स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि ग्राहक सेवेप्रती असलेली त्यांची बांधिलकी ! येथील कर्मचारी त्यांच्या विनम्र आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात, ज्यामुळे गर्दीच्या वेळीही कामकाज अत्यन्त सुरळीतपणे चालते. कोविड-१९ महामारीच्या काळात जेव्हा जग ठप्प झाले होते, तेव्हा देशमुख फास्ट फूडने सेवेशी कोणतीही तडजोड न करता सुरक्षिततेला प्राधान्य देत "शून्य-संपर्क डिलिव्हरी" सुरू ठेवली होती याचा उल्लेख इथे आवर्जून करावा असाच आहे !
अगदी आजही जागतिक गॅस पुरवठ्याच्या आव्हानांच्या कठीण परिस्थितीतही, स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी या आउटलेटने इंडक्शन आणि कोर्सा कोळशाचा वापर करून स्वतःला अद्ययावत केले आहे — हे पुन्हा एकदा सिद्ध करते की लोकांच्या सेवेत एकही दिवस चुकलेला नाही...! आणि हेच समस्या-निवारक मानसिकता आणि लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची तत्परता दर्शवते.
प्रत्येकाने आम्हाला विचारले
देशमुख फास्ट फूडचे गुपित !
आम्ही एक अग्रगण्य आणि दिग्गज फास्ट फूड आउटलेट कसे बनलो याच एक गुप्त गुपित आहे ज्याचं नांव "कष्ट"!
१९९० मधील एका विनम्र सुरुवातीपासून ते आज २०२६ मध्ये सुद्धा एक लोकप्रिय ब्रँड बनण्यापर्यंत, देशमुख फास्ट फूड हे चिकाटी, गुणवत्ता, सातत्य आणि ठाण्याच्या स्वादिष्ट अभिमानाचे प्रतीक म्हणून उभे आहे.....!