VOICE OF INDEPENDENT MEDIA

 विश्लेषण
The Independent Voice

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने; केंद्रीय उपाध्यक्षपदी अमोल पाटील यांची निवड

News Reporter   16-02-2026 08:46:09   1478

कोल्हापूर / प्रतिनिधी

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. केंद्रीय व राज्य कार्यकारिणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला (सोलापूर) येथील सतीश भाऊ सावंत, राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले, प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील, राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तसेच मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांची निवड करण्यात आली.

केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या अमोल पाटील यांनी संघटनेच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी विशेष पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील त्यांचा अनुभव, जागतिक व्यावसायिक संपर्क आणि धोरणात्मक नियोजनातील कौशल्याचा उपयोग करून संघटनेला जागतिक स्तरावर नेण्याचा त्यांचा मानस आहे.

त्याअंतर्गत संघटनेचा आंतरराष्ट्रीय विस्तार आराखडा तयार करणे, विविध देशांमध्ये संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी नेमणे, परदेशातील डिजिटल मीडिया संपादक व पत्रकारांशी समन्वय प्रस्थापित करणे, तसेच जागतिक स्तरावर परिषद व वेबिनार आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लवकरच विविध देशांमध्ये संघटनेच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

या बैठकीस प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.





 जाहिराती