VOICE OF INDEPENDENT MEDIA

 विश्लेषण
The Independent Voice

पिंपरी-चिंचवड खरंच स्वच्छ शहर? की केवळ पुरस्कारापुरते?

News Reporter   11-09-2025 08:05:13   1087

अजितदादांनी विचारल्या प्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला पण शहर खरोखर स्वच्छ झाले का? 

पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यात आलेला पुरस्कार याची खरा अर्थाने चौकशी झाली पाहिजे की खरंच कुठल्या निकषावर हे पुरस्कार दिले?

कारण शहरात गल्लोगल्ली कचराचे ढीग  नाही तर अक्षरशः डोंगर आहेत गल्लोगल्ली रस्त्यावर कचरा जमा आहे परंतु १५-२० झाले तरी कोणीही कचरा उचलत नसल्याने रस्त्यावर कचरा अक्षरशः मानवी आरोग्यासाठी धोकादायक बनतो आहे.

मग  पिंपरी चिंचवड हे खरंच स्वच्छ शहर आहे ?

“ स्मार्ट सिटी “ म्हणून कितीही पाठ थोपटून घेतली तरी तुम्ही “ सारथी “ वर कितीही वेळा तक्रार केली तरी त्याची दखल घेतली जात नाही. “ सारथी “ लाच दिशा नाही हे वास्तव आहे 

आणखी कहर म्हणजे शहरात नागरिकांच नाही तर “ भटक्या कुत्र्यांच “ राज्य आहे 

त्याबद्दलही तुम्ही कितीही तक्रार करा अगदी पशुसंवर्धन अधिकारी या पदावर असलेल्या “ दगड “ अधिकाराला तुम्ही कितीही फोन केले तरी ते अजिबात हलत नाहीत.

भटक्या कुत्र्यांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले तर असुरक्षित आहेतच पण रात्रभर सुरु असलेल्या कुत्र्यांच्या गोंगाटामुळे झोपही नाही आणि त्यांच्या क्रिडाप्रकारामुळे रस्तेदेखील अस्वच्छ आणि विष्ठामय आहेत 

या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या करांच्या पैशातुन नागरिकांना एवढ्या मुलभूत सुविधा देणार नसेल तर महापालिकेने कर गोळा न करता नागरिकांना या सर्वांसाठी स्वखर्चाने तजवीज करायला लावली. त्याचबरोबर कचरा टेंडर आणि भटक्या कुत्र्यांसाठीचे टेंडर यांचीही चौकशी करण्यात यावी

उदाहरणादाखल या सर्व प्रकाराचा जिवंत डेमो पहायचा असेल महापालिका आयुक्तांनी संगम नगर , जुनी सांगवी येथे भेट द्यावी


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.





 जाहिराती