बीड जिल्ह्यात अजित पवारांची पालकमंत्री म्हणून अतिसक्रियता; आगामी लोकसभा निवडणुकीसाठी “चिरंजीवा”साठी मतपेरणी सुरू
बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून प्रचंड सक्रिय दिसत आहेत. विकासकामे, बैठका, दौरे आणि विविध कार्यक्रमांद्वारे त्यांनी जिल्ह्यात आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली आहे. मात्र ही अतिसक्रियता आगामी लोकसभा निवडणुकीशी जोडली जात असून, खासकरून “चिरंजीवा”साठी मतपेरणीचा भाग म्हणून पाहिली जात आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा अशीही आहे की, अजित पवारांच्या भावी सुनबाई स्वतः या सर्व कार्यक्रमांमागे इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे कार्यक्रमांचे नियोजन, जनतेशी संवाद व प्रचाराचा टेम्पो यामध्ये एक वेगळाच रंग दिसतो आहे.
स्थानिक नेते व कार्यकर्ते मात्र यावर भाष्य करण्यास टाळाटाळ करत असले तरी, बीड जिल्ह्यातील पवार कुटुंबाची ही हालचाल आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरणार हे नक्कीच.