पुणे जिल्हास्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा काळेपडळ हडपसर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त बुडो मार्शल आर्ट जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण पुणे जिल्ह्यातील दीडशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सप्टेंबर महिन्यामध्ये बुडो मार्शल आर्ट राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धे साठी निवड चाचणी घेण्यात आली. याप्रसंगी बुडो फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुधाकर पणीकर तसेच ऍड,अमोल पाटील राज्य संघटक डिजिटल मीडिया पत्रकार संघटना, श्री पराग डिंगळकर पीपीसी न्यूज संपादक ,महेश टेळे पाटील अध्यक्ष मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान, मच्छिंद्र गायकवाड उपाध्यक्ष जनस्वराज्य फाउंडेशन, अतुल येवले ,अंकुश पारवे ,नरेंद्र साबणे, लतेन्द्र भिंगारे इत्यादी उपस्थित होते.
या वेळी बोलताना ॲड अमोल पाटील यांनी नमूद केले की –
आज महापुरुषांच्या जयंतीला डीजे व धांगडधिंगा करण्याची स्पर्धा लागली असताना,ज्याप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आत्मविश्वास दिला, समानतेचा हक्क दिला आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली.त्याचप्रमाणे आयोजकांनी आज या स्पर्धेतून खेळाडूंमध्ये जी शिस्त, धैर्य आणि सामूहिकतेचा संस्कार होत आहे, तीच अण्णाभाऊंना खरी श्रद्धांजली आहे!
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रथमेश कांबळे अनुराग पारवे, माधवी तौर, प्रणिता कांबळे ,वैष्णवी मिटापल्ली ,अर्णव गायकवाड, सार्थक जगताप ,क्षितिज रसाळे, हर्ष मोरे, मनोज करडे, प्रतीक रणदिवे, सुरेश जाधव ,सतीश जाधव ,अमीर पठाण ,राजू जाधव ,आदित्य जाधव यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्वांचे बुडो मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र च्या वतीने लहू पारवे यांनी आभार मानले यशस्वी खेळाडूंचे संपूर्ण परिसरात अभिनंदन कौतुक केले जात आहे.