देवगाव, ता.१४/०८/२०२५:
दरवर्षीप्रमाणे यंदाही “मालन प्रतिष्ठान” तर्फे आदर्श माता मालन सुब्राव पाटील यांच्या गौरवार्थ जाहीर करण्यात आलेली “मालन स्कॉलरशिप” जाहीर करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. रामेश्वरबप्पा सुब्राव पाटील यांनी ही माहिती दिली.
या वर्षीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता दहावीतील पहिल्या चारही गुणवंत विद्यार्थी मुलीच आहेत, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले.तसेच हायस्कूलच्या १०० % निकालाबद्दल सर्व अध्यापकांचेही विशेष कौतुक केले आणि सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
मा. रामेश्वर बप्पा पाटील म्हणाले की,
“आमची आई मालन भाभी यांच्या त्याग, कष्ट आणि कर्तृत्वामुळेच आम्ही व आमची पुढची पिढी आज या उंचीवर पोहोचलो आहोत. आमच्या कुटुंबाच्या यशस्वी प्रवासात केवळ आईच नव्हे, तर गावातील अनेक थोरामोठ्यांचा मोलाचा हातभार लाभला. त्यांच्या सन्मानार्थ ही स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे आणि ती पुढेही सुरू राहणार आहे.”
“मालन स्कॉलरशिप” अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थिनी आणि त्यांना मिळणारे बक्षीस पुढीलप्रमाणे आहे:
🔹 प्रथम क्रमांक
👤 मारकड सृष्टी दशरथ – ८२.६०%
🎁 बक्षीस: ₹५,०००
🔹 व्दितीय क्रमांक
👤 माने तनुजा यशवंत – ७६.६०%
🎁 बक्षीस: ₹३,०००
🔹 तृतीय क्रमांक
👤 सांगुळे सानिका हनुमंत – ७५.८०%
🎁 बक्षीस: ₹२,०००
🔹 चौथा क्रमांक
👤 मांजरे अपेक्षा हनुमंत – ७४.२०%
🎁 बक्षीस: ₹१,०००
या स्कॉलरशिपचे वितरण १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता, न्यु हायस्कूल, देवगाव येथे, गावातील आणि परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
गावातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन मालन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.