पिंपरी : रक्षाबंधनाचा पवित्र सण पिंपरी मतदारसंघात उत्साहात साजरा झाला. शाहू नगर, संभाजीनगर, दत्तनगर, विद्यानगर, मोरवाडी परिसरातील 500 हून अधिक महिलांनी आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात उपस्थित राहून त्यांना राखी बांधली.
विशेष उपक्रमात महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बंद लिफाफ्यातून 1000 हून अधिक राख्या पाठवल्या. या राख्यांद्वारे महिलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला सन्मान आणि सुरक्षिततेसाठी घेतलेल्या उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांनी महिलांना आर्थिक बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांनी आमदार गोरखे यांच्या कार्याचीही प्रशंसा करताना सांगितले, “आमदार गोरखे यांनी आमच्या मतदारसंघातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. त्यांना राखी बांधताना खऱ्या भावाचा आधार मिळतो.”
आमदार गोरखे म्हणाले, “सण परंपरेसोबत नात्यांना दृढ करतात. माझ्या बहिणींच्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. महिला सन्मान व सुरक्षिततेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे.”
या कार्यक्रमाला नगरसेविका अनुराधा गोरखे, भाजपा पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष सुप्रियाताई चांदगुडे, मनीषा शिंदे, दीपाली करंजकर, कुसुम वाघमारे, जयश्री पाटील तसेच अनेक महिला बचतगट उपस्थित होते.