VOICE OF INDEPENDENT MEDIA

 विश्लेषण
The Independent Voice

*सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील यशोगाथा: सौ.आरती निलाखे आणि मंदप्रभा फार्मर् प्रोड्यूसर कंपनीचा प्रवास*

News Reporter   24-12-2024 18:59:55   35

स्थापना आणि सुरुवात

23 जून 2020 रोजी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली. स्थानिक महिलांनी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पामार्फत प्रशिक्षण घेऊन शेती व पूरक व्यवसायाचे उपक्रम सुरू केले. शिखर शिंगणापूर येथे आरती निलाखे यांनी महिलांना सोबत घेऊन "मंदप्रभा फॉर्मर प्रोडूसर कंपनी" स्थापन केली व "ऍग्रो जेम्स" या ब्रँडची सुरुवात केली.

 

प्रमुख सहकारी

आरती निलाखें यांना श्रीमती अंजू तोडकर, सौ. प्रिया डोंबे, सौ. रुपाली सातपुते, व श्रीमती वासंती होनराव यांनी सहकार्य केले. या महिलांनी ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाने आणि प्रशिक्षणाने आपल्या उपक्रमांना स्थिरता दिली.

 

शेतीमालाचे मूल्यवर्धन व विक्री

कंपनीच्या माध्यमातून मूग, राजमा, हरभरा, उडीद, तूर, मका आदी पिकांचे मूल्यवर्धन केले जाते. सध्या तयार माल संपूर्ण भारतात वितरित केला जातो. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्व आफ्रिकेतील संस्थांसोबत बोलणी सुरू आहेत.

 

यश आणि सन्मान

कंपनीने स्थानिक व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला. 2024 च्या खरीप हंगामात 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला माल कंपनीद्वारे विक्री केला आणि योग्य मोबदला मिळवला. कंपनीला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे:

1. आदर्श कृषी सेवक संस्था - साप्ताहिक कृषी सेवक.

2. लीडरशिप लीडर्स ऑफ द इयर - इंटरनॅशनल इकॉनोमिक टाइम्स.

 

आरती निलाखे यांचे योगदान
अर्थशास्त्रातील पदवीधर असलेल्या आरती निलाखें यांनी घरच्या किराणा व्यवसायाचा अनुभव व सासरच्या परिस्थितीतून प्रेरणा घेऊन शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना राबवली. त्यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानच्या साहाय्याने प्रशिक्षण घेतले आणि मोजक्या भांडवलातून व्यवसायाला दिशा दिली. सद्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एक हजार ऐंशी मॅट्रिक टन क्षमतेचे वेअर हाऊस व सुसज्ज अशा यंत्रणा असलेले युनिट शिखर शिंगणापूर येथे उभे केले आहे

 

उपसंहार
माण तालुक्यातील महिलांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि नवकल्पना आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या प्रयत्नांनी केवळ स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती झाली नाही, तर शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि योग्य मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.





 जाहिराती