VOICE OF INDEPENDENT MEDIA

 विश्लेषण
The Independent Voice

सावधान - मराठवाड्यात अजून आत्महत्या वाढवणार सोयाबीन

ऍड अमोल पाटील - आयात निर्यात तज्ज्ञ    06-08-2024 13:18:40   268

प्रति 

मा कृषी मंत्री सर्व आमदार खासदार
महाराष्ट्र राज्य  

1- मागील 4 वर्षातील सर्वात नीचांकी दर  गाठला असून सोयाबीन हे भारतात पिकणारे प्रमुख तेल वर्गीय पीक आहे 2022- 10 हजार प्रति क्विंटल वरून आता सध्या 4300 ते  4400 प्रति क्विंटल भाव असून जो हमीभावापेक्षा 10% कमी आहे. यासाठी आपण  आता काय ठोस उपाययोजना करणार ?
2-
नवीन सोयाबीन ऑक्टोबर मध्ये येणार त्यात मागील दोन हंगामातील सोयाबीन चे साठे हंगामातील चांगल्या भावाच्या अपेक्षेने उत्पादक शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. परंतु किमतीत सुधारणा होण्याऐवजी घसरणच होत आहे त्यातच सोयाबीन साठवणुकीचा खर्च हा 6500/- प्रति क्विंटल होतो आहे तर बाजारभाव 4300/- असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे
3-
चालू वर्षात जवळपास 124 लाख हेक्टर सोयाबीन ची पेरणी त्यातच पाऊस चांगला असल्यामुळे उत्पादनात - लाख टन वाढ होऊन उत्पादन .१५ ते . कोटी टन होईल .देशांतर्गत पुरवठा चांगला राहील त्यामुळे सोयाबीन ला योग्य दर मिळण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
4-
सप्टेंबर पासून अमेरिका त्यानंतर ब्राझील आणि अर्जेंटिना यांचे सोयाबीन बाजारात येते मागील वर्षापेक्षा सर्वांचे उत्पादन चांगले असणार आहे त्यामुळे भारतीय सोयाबीन चा भाव घसरणार नाही यासाठी काय योजना आखल्या जाणार 5- रिफाईंड खाद्यतेलावर कमी शुल्क असल्याने त्याची आयात वाढली, गेल्या तिमाहीत विक्रमी ५० लाख टन खाद्य तेल आवक त्यामुळे स्थानिक सोयातेल उत्पादनाला मर्यादित मागणी त्यामुळे देखील भाव घसरत आहेत.
6-
अर्थसंकल्पात तेलबिया आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आला त्यासाठी किती निधी राखून ठेवला ?
7-
आयात निर्भरता कमी करायची असेल तर तेलबियांना निदान हमीभाव मिळेल याची शाश्वती द्यावी
8-
अमेरिकी सोया पेंड स्वस्त झाल्या मुळे आपल्याला सोयपेंड कमी भावात निर्यात करावी लागेल तरी सोयपेंड निर्यातीला अनुदान द्यावे जेणेकरून देशांतगर्त सोयाबीन च्या किमती सुधारतील.देशांतर्गत बाजारात सोयपेंडला चांगली मागणी आहे परंतु मक्याच्या चोथ्याचा स्वस्त पशुखाद्य  वापरला जात आहे त्यामुळे तुलनेने महाग असणाऱ्या सोयापेंड ला आव्हान निर्माण झाले आहे.
9- 
सध्याच्या १२. % आयात शुल्कात भरीव वाढ करावी जेणेकरून उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण होईल तसेच रिफाईंड तेलावरील आयात शुल्कात वाढ केली जावी.
                 
वेळ गेल्यावर प्रेत मोजण्या पेक्षा आणि तुटपुंजी मदत करण्यापेक्षा  वेळीच केंद्राकडे पाठपुरावा करा हि समस्त शेतकऱयांच्या वतीने कळकळीची मागणी  

                                                            ऍड अमोल पाटील - आयात निर्यात तज्ज्ञ 
पुणे

9881998997
[email protected]



जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.





 जाहिराती