महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 17 नोव्हेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अनुभवाची अट व सेवा प्रवेश नियमातील त्रुटी असल्याच्या कारणास्तव राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळे औषध निरीक्षक पदाची जाहिरात स्थगित करण्यात आली होती.औषध निरीक्षक पदासाठी अनुभवाची अट असल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी पासून वंचित राहणार होते. परंतु आत्ताच राज्य सरकारकडून औषध निरीक्षक पदासाठी असलेले सेवा प्रवेश नियम अधिनियम प्रसिद्ध करण्यात आलेला असून त्यात अनुभवाची अट रद्द करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात दोन वर्षापासून वादात सापडली होती. आता ही भरती प्रक्रिया एमपीएससी कडून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी अपेक्षा राज्यातील उमेदवार बाळगून आहेत आहे. राज्यातील औषधनिर्माणशास्त्र विद्यार्थ्यांसाठी ही संधी प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाचक आशी अनुभवाची अट औषध निरीक्षक पदासाठी अनेक वर्षापासून होती. जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षे उलटुन गेली तरी सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध होत नव्हते त्यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार निवेदने पत्रव्यवहार करून आता सेवा प्रवेश नियम अंतिम झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम फार्मसीच्या पदवीधरकारांना आता ही परीक्षा देता येईल, हा विद्यार्थ्यांसाठी सुवर्णक्षण असेल. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदित्य वगरे औषधनिर्माणशास्त्र विद्यार्थी आंदोलक