मालकांनी गावजेवण ठेवलेलं आहे.
सगळ्यांनी चुलबंद यायचं आहे.
पंगत देवळाच्या पटांगणात आहे.
पंगतीला बुंदी, गुलाबजाम, बर्फी, साधा –मसालेभात , वरण , शाकभाजी, कोशिंबीर, पुऱ्या सगळ आहे.
नक्की यायचं बर.
अरे पण जेवण कधी आहे ?
मालकांच्या नातवाच्या बारश्याला ?
शाब्बास ,
अजून मालकांच्या पोराच लग्न नाही.
त्याच लग्न कधी जमेल माहिती नाही.
लग्न जमल तर पोर होईल कधी माहिती नाही.
पोर झाल तरी तो नातू होईल कि नात माहिती नाही,
पण जेवण आहे नक्की.
महिला आरक्षण हे असच जेवणाच निमंत्रण आहे.
आरक्षण लागू कधी ?
मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर.
पुनर्रचना कधी ?
जनगणना झाल्यावर.
जनगणना कधी ?
विधेयक आल्यावर ?
विधेयक कधी ?
जातवार जनगणना करण्याचा गुंता सुटल्यावर.
याला म्हणायचं लबाडाघरच आवताण.
ताई माई अक्का,
याला किती भुलायच ते तुमचं तुम्ही ठरवा.