VOICE OF INDEPENDENT MEDIA

 बिजनेस अपडेट
The Independent Voice

आयात- निर्यात धोरण कुणासाठी

ॲड अमोल पाटील   28-08-2023 10:39:50   254

जागतिक पातळीवर या साऱ्या शेतीमालाच्या .. उत्पादनात लाखो हेक्टर्स जमिनी हडपून यांत्रिक भांडवली पद्धतीने बहुराष्ट्रीय कंपन्या उतरल्या आहेत. शेतीमालाच्या जागतिक आयात- निर्यात व्यापारावर तर फक्त चार ते पाच बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी आहे. त्यात भर पडली आहे ती शेतीमालाच्या कमोडिटी एक्स्चेंजवर धुमाकूळ घालणाऱ्या वित्त भांडवलाची. त्यामुळे आपल्या देशातील सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर कोणाचा, किती व कसा प्रभाव पडत असेल हे स्वच्छ दिसून येते.

या सगळ्यातील गुंतागुंत लक्षात न घेता धडाधड निर्णय घेतले जातात. संसदेतील व विधानसभांतील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींमध्ये शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रतिनिधींची संख्या लक्षणीय असते. शिवाय शेतीशी निगडित उपजीविका असणारे मतदार संसदेत, विधानसभांमध्ये आपले प्रतिनिधी निवडून पाठवत असतात. पण तरीही शेतीविषयक धोरणे ठरवताना त्यात शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी असते का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.





 जाहिराती