राजगुरुनगर :- येथील हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या वतीने विशेष सामाजिक क्षेञात उल्लेखनिय कामगिरी बद्दल मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला.
हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनचा, चौथा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. मंदार जावळे साहेब होते. त्यांच्या हस्ते श्री. रवी लालासो बोडके,यशोधन ट्रस्ट वेळे जिल्हा सातारा यांना,हुतात्मा राजगुरू समाज गौरव पुरस्कार व रू.११०००/- देऊन गौरविण्यात आले. तसेच राजगुरुनगर चे सुपुत्र, श्री.प्रशांत पांडुरंग कडूसकर,कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे प्रकल्प यांना राजगुरुनगर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच फाऊंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक कै. पी. टी.शिंदे गुरुजी यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री.मिलिंद शिंदे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती,रोटरी क्लब ,बजरंग दल आदी २२ संस्थाचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
पाहुण्याचे स्वागत, फाउंडेशनच्या आध्यक्षा सौ.मनीषा टाकळकर - पवळे यांनी केले.सौ.साधना बाजारे यांनी सामाजिक कार्य संधर्भात एक प्रभावी गीत सादर केले. मानपत्रांचे वाचन डॉ. गायकवाड,सौ.मीनाक्षी पाटोळे, व श्री.उत्तम राक्षे या संचालकांनी केले. फाउंडेशनच्या कार्याचा आढावा संचालिका सौ. संपदाताई सांडभोर यांनी मांडला. या प्रसंगी श्री.रवी बोडके,श्री.प्रशांत कडूसकर,श्री. मिलिंद शिंदे, श्री.बाबा राक्षे व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. मंदार जावळे साहेब यांनी आपले विचार मांडून फाऊंडेशन करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमास श्री.बाबा राक्षे,प्रदीप कासवा, तसेच जाणीव परिवार,जाणीव जागृती मंच, ज्येष्ठ नागरिक संघ आदि २२ पेक्षा अधिक संस्था व त्यांचे सभासद राजगुरुनगर मधील दानशूर नागरिक बहुसंख्येने हजर होते.
आभार फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब सांडभोर यांनी मानले. सूत्रसंचालन संचालक श्री.कैलास मुसळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक संचालक श्री. कैलास दुधाळे,श्री.अमर टाटिया,श्री.दिलीप होले,श्री.सचिन वाळुंज,श्री. संतोषशेठ सांडभोर,श्री.दत्ता रुके,श्री. राहुलशेठ वाळुंज,श्री.राजन जांभळे, श्री. सुनील वाळुंज, श्री.राहुल मलघे,सौ.संगीता ताई तनपुरे ,बुरसे ताई,डॉ.वंदना शेवाळे नाझनिन शेख,आदींनी परिश्रम घेतले.