चाकण : चाकण येथील महात्मा फुले मित्र मंडळाच्या मानाच्या गणपतींचे ढोल - ताशा, लेझीम या पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणपती विसर्जना निमित्त मिरवणूक काढण्यात आली यावेळी स्व. आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका व महात्मा फुले मित्र मंडळाचे सर्व आजी-माजी कार्यकर्ते उपस्थित होते. मिरवणुकीसाठी स्वराज्य ढोल पथक यांनी वाद्यांच्या गजरात काही प्रात्यक्षिके करून दाखवली यामुळे मिरवणूक पाहण्या साठी आलेल्या प्रेक्षकांची तोबा गर्दी झाली होती.