चाकण : लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या वतीने ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे निता शेवकरी-बारवकर यांचा जेष्ठ समाजसुधारक मा गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते शिक्षक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रांतपाल ला.राजेश कोठावदे, ख्यातनाम कवी व साहित्यिक अनंत राऊत, द्वितीय उपप्रांतपाल सुनिलजी चेकर, ला.मुरलीधर साठे, ला.सुदाम मोरे, ला.अनिल झोपे, ला.दिलीपसिंह मोहिते, ला.प्रकाश मुटके, ला.संतोष सोनावळे, उद्योजक सुशील शेवकरी, मेघा शेवकरी आदी उपस्थित होते.
दरम्यान शेवकरी यांच्या आर्ट वर्ल्ड ड्रॉइंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी श्रेया कोळेकर, मैत्री कुंजीर, श्रेया नाणेकर, प्रतीक्षा पाटील, अंकिता भरकड, तन्वी वाघोले, वैष्णवी गाधारी, ऐश्वर्या निसळ यांनी सर्व मान्यवरांचे तयार केलेले स्केच भेट देण्यात आले. सर्व मान्यवरांनी शेवकरी मॅडम आणि त्यांच्या क्लासच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
निता शेवकरी या नवोन्मेष विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज चाकण, गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल चाकण येथे कला शिक्षिका म्हणून काम करित आहे. तसेच २०१२ पासून चाकण येथे व या वर्षापासून पासून भोसरी येथे आर्ट वर्ल्ड ड्रॉइंग क्लासेस च्या माध्यमातून ड्रॉइंग क्लास घेत आहे.