चाकण : एमआयडीसी परिसरातील गुन्ह्यांना आळा बसण्याकरिता गुन्हे घडत असलेल्या ठिकाणची माहिती गुन्ह्यांचा अभ्यास करून गुन्ह्यांचे क्राईम मॅपिंग करण्याची सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्याने माननीय पोलीस उपायुक्त मंचक इपर,सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या सूचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी माळुंगे पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार यांना क्राईम मॅपिंगनुसार पेट्रोलिंग करण्याचे सूचना दिल्या होत्या.
दिनांक १४/८/२०२२ रोजी रात्री १० वाजताचे सुमारास एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करित असताना वराळे गावचे हद्दीतील कॉर्निंग कंपनीचे जवळ काही मुले हत्यारांशी सज्ज असून ते नजीकचे ॲमेझोन कंपनीवर दरोडा टाकून माल लुटण्याचे तयारीत असल्याची बातमी गोपनीय बातमीदार मार्फत मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाईचे सूचना व मार्गदर्शन केले, त्यानुसार सदरचे दरोड्याचे तयारी मधील दरोडेखोर पळून जाणार नाहीत याची काळजी घेऊन चोहोबाजूंनी वेढा घालून दरोड्याचे तयारीत असणारे मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचे जवळ खालील प्रमाणे हत्यारासह मिळून आली.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सागर राहुल राठोड वय २० वर्ष ( चक्रपाणी वसाहत भोसरी), महेश कान्हा राजपूत वय १९ वर्ष ( गोडाऊन चौक भोसरी ) व यांच्यासह इतर तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. यांच्याकडे एक लोखंडी कोयता, एक लोखंडी रॉड, एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी पाईप याबरोबरच जप्त मुद्देमाल ३४०००० रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण ३६ फोन तसेच ६०००० रुपये किमतीचे २ मोटार सायकल मिळून आल्या आहेत.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, दत्तात्रय जाधव तसेच पोलीस अंमलदार राजू कोकणेरी, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, संतोष होळकर, अनिल महाजन, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, संतोष वायकर, राहुल मिसाळ, अमोल माटे, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, तसेच पोलीस चालक संजय शिंदे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण हे करीत आहेत.