चाकण : कारवाई न करता गाडी परत देण्यासाठी 7 हजाराची लाच स्वीकारताना चाकण वाहतूक पोलिसाला मंगळवारी ( दि.6) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
चाकण वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब अंबादास जायभाय (वय 32) व खासगी मदतनीस किशोर भगवान चौगुले (वय 43) अशी अटक आरोपींची नवे आहेत.या प्रकरणी 22 वर्षीय तरुणाने तक्रार दिली होती.
चाकण वाहतूक विभागाने कारवाईसाठी तक्रारदार यांची दुचाकी ताब्यात घेतली होती.कारवाई न करता दुचाकी देण्यासाठी जायभाय याने 10 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती7 हजार देण्याचे ठरले.ही 7 हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी जायभय व त्याचा मदतनिस चौगुले याला अटक केली आहे.
सदरची कारवाई, राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे,अप्पर पोलीस अधीक्षक लाच गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शितल घोगरे व सहकाऱ्यांनी केली.