VOICE OF INDEPENDENT MEDIA

 Cricket
The Independent Voice

बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनखात्याने लावला पिंजरा

News Reporter   28-08-2022 20:35:01   388

चाकण : जवळील राक्षेवाडी येथे बिबट्यांचा वावर असल्याचे स्थानिक नागरिकांच्या गेले एक महिन्यापासून निदर्शनात येत आहे. या संदर्भात नागरिकांनी वन खात्याकडे लेखी अर्ज देऊन ही बाब वन खात्याच्या निदर्शनात आणली होती. परंतु बिबट्यावरती ठोस उपाय योजना होण्यासाठी वन खात्याकडून कोणतेही पाऊल उचलले जात नव्हते. बिबट्यावर ठोस उपाययोजना होण्यासाठी बिबट्यांचा वावर असल्याचे ठिकाणी पिंजरे केव्हा लावणार? तसेच बिबट्याकडुन भविष्यामध्ये मनुष्यहानी होऊ नये ही बाब लोकांनी वन खात्याच्या निदर्शनास आणून दिली होती. वन खात्याने बिबट्याचा वावर असल्याच्या ठिकाणी पिंजरे लावले आहेत व वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरे ही वापरात आणत आहेत.


For News & Advertisements Contact Us.





 ADVERTISEMENT