VOICE OF INDEPENDENT MEDIA

 Sports
The Independent Voice

पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द ग्रेड सेपरेटर ची उंची कमी असल्याने रोजच होतात अपघात

News Reporter   14-07-2022 14:59:11   271

चाकण : वाकी खुर्द सुंबरेनगर हद्दीतील पुणे-नाशिक हायवे वर सलग तिसरा दिवशी आज सकाळी दहा साडे दहा च्या दरम्यान अपघात झाला.चाकण बाजूकडून खेड कडे वेगाने जाणारी पीएमपीएमएल बसने पुढे वळणावर वळणाऱ्या खासगी बस ला जाऊन जोरात धडकली, धडक एवढी होती की खासगी बस त्या धडकेने गोल फिरली आणि शेजारून जाणाऱ्या मोटरसायकल स्वार ला त्याचा धक्का बसून मोटारसायकल वरील इसम जखमी झाले, यावेळी तब्बल अर्धा ते पाऊण तास वाहतूक खोळंबली होती.रस्त्याच्या मध्यभागी असलेले ग्रेड सेपरेटर ची उंची रस्त्याचा बरोबरीला आली असल्याने काही वाहनचालक ग्रेड सेपरेटर वरूनच गाडी दुस-या लेन मध्ये नेतात परिणामी काळोबा महाराज माथ्यावरून (चाकण बाजुकडून) येणारी वाहने वेगाने येत असल्याने ऐन वेळी ब्रेक कमी लागून अपघात होतात व गाडी डिव्हायडर वर चढून दुस-या लेन मधील वाहनांवर आदळतात, याबाबत प्रशासनाने ग्रेड सेपरेटर ची उंची वाढवून स्पीड ग्रेडर बसवण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.


For News & Advertisements Contact Us.





 ADVERTISEMENT