चाकण : पुणे जिल्ह्यातील झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे पाच तालुके वगळता सर्व तालुक्यातील प्रि स्कूल, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळांना १४/७/२०२२ ते दिनांक १६/७/२०२२ पर्यंत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.