राजगुरूनगर : आदिवासी भागातील मुलांच्या अनेक अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घातला पाहिजे असे आवाहन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी टोकावडे ता खेड येथे केले.
टोकावडे ता खेड येथे श्री कोटेश्वर आदिवासी विद्यार्थी वसतिगृहास स्वर्गीय राहुल सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांची बहीण मोहिनी राक्षे यांनी स्वखर्चातून इमारत बांधणार असून त्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी वनघरे बोलत होते. यावेळी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी अध्यक्ष सलीम तांबोळी, भाजप महिला मोर्चा जिल्हा सचिव मोहिनी राक्षे, विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर जेष्ठ पञकार रामचंद्र सोनवणे पालवी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा कड, सामाजिक कार्यकर्ते मछिंद्र पवळे, टोकावडे चे माजी सरपंच गणपत विरणक, उपसरपंच शामल केदारी, हभप दत्तात्रय मोरमारे, किरण देवरे, आरती राक्षे, संजय बोंबले, महेश यादव, आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक अध्यक्ष बशीर तांबोळी, आयाज तांबोळी यांच्यासह स्वर्गीय राहुल सावंत यांचा मित्रपरिवार, वसतिगृहातील मुले, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठ्ठल वनघरे म्हणाले, आदिवासी भागातील मुलांच्या अनेक अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत मात्र सेवाभावी आणि दानशूर व्यक्तीचा पुढाकार महत्वाचा आहे. आदिवासी भाग असल्याने अनेक अडचणी असतात. स्वर्गीय राहुल सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या भगिनी मोहिनी राक्षे यांनी येथील आदिवासी विद्यार्थ्यांची गरज लक्षत घेऊन त्याना हक्काची इमारत असावी या भावनेतून इमारत बांधणार असल्याने या भागातील विदयार्थ्यांची राहण्याची अडचण दुर होणार आहे.
यावेळी सलीम तांबोळी, माजी सरपंच गणपत विरणक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मोहिनी राक्षे यांनी तर आभार बशीर तांबोळी यांनी मानले.