चिपळूण : सावर्डे येथे माजी सभापती पूजा निकम व“राधा गोविंद”फ़ाउंडेशन च्या माध्यमातून सावर्डे-कोंडमळा परिसरातील गरीब व गरजू होतकरू अशा २० विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.तसेच संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे माध्यमिक विद्यालयास शालेय कामकाजाकरिता संगणक संच देण्यात आला.सावर्डे परिसरातील दोन गरजु कुंटूंबाना गॅस सिलेंडर व शेगडी देण्यात आले.आमदार शेखर निकम,जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव,माजी सभापती शौकत मुकादम अनिरूध्द निकम व अन्य मान्यवर उपस्थित होते.