राजगुरूनगर : दारासमोर रांगोळी आणि घरावर ध्वज उभारून कार्यकर्त्यांनी भाजपचा ४२वा स्थापना दिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्थापना दिना निमित्त तालुका भाजप कार्यालयामध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की,यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. दुसरीकडे, जागतिक स्थिती झटपट बदलत असून भारताकडे नव्या संधी सातत्याने येत आहेत. तसंच भाजपचं डबल इंजिन सरकार चार राज्यांमध्ये पुन्हा सत्तेत आलं आहे, या तीन कारणांमुळे यंदाचा भाजप स्थापना दिवस महत्वपूर्ण आहे.
त्यानंतर प्रतिमापूजन करण्यात आले व राजगुरूनगर शहरातील जेष्ठ भाजप कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ देऊन ऋण वेक्त करण्यात आले. माधव काका खेडकर, गजानन पाठक, नंदकुमार कोरे व जे बी ओसवाल यांनी जुना आठवणींना उजाळा दिला,यावेळी किशोर कुमठेकर बोलताना मोदींचे सरकार पंडितजींच्या विचारावर काम करित आहे. गरीब कल्याण योजना कशातून आली, तर ही योजना गरीबातील जो शेवटचा माणूस आहे, त्यापर्यंत योजना पोहोचायला पाहिजे. शेवटच्या माणसाचे कल्याण झालं पाहिजे. सगळ्या उपेक्षित घटकांपर्यंत सरकारच्या माध्यमातून सर्व योजना गेल्या पाहिजेत, तरच त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. यासाठी आम्हीस हे काम निरंतर करावे लागेल.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, किशोर कुमठेकर, बाळासाहेब कहाणे, दीप्ती कुलकर्णी, निलेश जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन किशोर कुमठेकर व बाळासाहेब कहाणे यांनी केले होते