राजगुरूनगर : गुळाणी (ता.खेड.)येथील घाटात नवी खडकी एकाने अज्ञात कारणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ( दि.८) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
विजय सावळेराम खेडकर (वय ४५ रा. नवी खडकी,येरवडा पुणे ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिस पाटील आश्विनी मंगेश राक्षे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर या घटनेची खबर दिली आहे.याबाबत खेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शेळके अधिक तपास करत आहे.