चाकण : ग्रामीण भागातील महिलांचेे सक्षमीकरण करण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला संस्था आणि ग्रामपंचायत रोहकल ( ता.खेड ) यांच्या सहयोगाने शिवणक्लास आणि ब्युटीपार्लर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष रत्ना पिंगळे(देशमुख),सचिव उषा पावडे,ग्रामसेवक योगेश कानडे,मुख्याध्यापिका मनिषा पोखरकर,विजया मंचरकर,सोनल टाकळकर,अश्विनी ठोंबरे,अमृता गायकवाड,शिवणक्लास प्रशिक्षिका माधुरी कानमोडे,पूजा काचोळे यांच्यासह महिला आणि तरुणी उपस्थित होत्या.
रत्ना पिंगळे(देशमुख) यांनी सांगितले की, "प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे,घरावर जेव्हा संकट येते तेव्हा घरातील स्त्रीच कणखरपणे उभी राहते,पण नुसते उभे न राहता जर आर्थिकदृष्ट्या ती सक्षमपणे उपस्थित राहिली तर नक्कीच कोणतं घर,कोणतं गाव,कोणताही समाज मागे राहणार नाही.महिलेकडे नेतृत्व, कर्तृत्व, धाडस,जिद्द,जबाबदारी यासारखे गुण असतात फक्त आजच्या काळात हे सर्व गुण प्रत्येक स्त्रीने जाणून घेऊन त्याप्रमाणे अंमलात आणले पाहिजे."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता ठोंबरे यांनी केले तर आभार नयन ठोंबरे यांनी मानले.