चाकण : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात येणारा आधारस्तंभ पुरस्कार राजगुरूनगर ( ता.खेड ) येथील अॅड.साधना बाजारे आणि चाकणचे मनोहर (बापु) शेवकरी यांना विज्ञान प्रसारक पद्यश्री अरविंद गुप्ता, सुप्रसिध्द पत्रकार अलका धुपकर आणि डॉ.शैला दाभोलकर यांच्या हस्ते देण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वार्तापत्र शतकवीर व आधारस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा पुस्तकांचे गाव भिलार,ता.महाबळेश्वर, जि.सातारा येथे संपन्न झाला,यावेळी लेखक डॉ.शंतनू अभ्यंकर, सिने अभिनेते किरण माने, हिलरेंज स्कूलच्या तेजस्वीनी भिलारे, डॉ.हमीद दाभोलकर,राजीव देशपांडे,अनिल चव्हाण,राज्य कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख,राहुल थोरात आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.