चाकण : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी खेड तालुक्याला मंत्रिपद देण्याची एकमुखी मागणी केली.
याप्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,संध्या जाधव,मंगल जाधव, कैलास लिंभोरे,सुरेखा मोहिते, अनिल राक्षे, रामदास ठाकुर,राम गोरे,विजय खाडे,मोबिन काझी,राहुल नाईकवाडी,विशाल नाईकवाडी,सागर बनकर,गुलाब शेवकरी, किरण कौटकर,मयूर वाडेकर,सुयोग शेवकरी यांच्यासह पंचायत समिती, बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त आमदार निवडून दिले. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुका खेड तालुक्यातील संघटनेने मोठ्या ताकदीने लढवून विजय मिळवला. येथील पक्ष संघटनेची ताकद मी जाणून आहे, असे त्यांनी सांगितले. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने लोकांना जागृत केल्याने आज आपण सत्तेत आहोत, याचे स्मरण जयंत पाटीलांनी कार्यकर्त्यांना करून दिले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुखावणारा क्षण आहे. निवडणुकीच्या काळात बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर पहिल्या बारी समोर घोडी धरण्याचा दिलेला शब्द मी खेड तालुक्यात पाळला,मात्र काहींनी त्याच राजकीय भांडवल करत टीका केल्या.
* खेड तालुक्याने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून प्रेम दिले आहे.परंतु तालुक्याला अजूनही न्याय मिळत नसल्याची खंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.राज्य मंत्रिमंडळात आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी करतानाच कार्यकर्त्यांनी ही जाहीर कार्यक्रमात तालुक्याला मंत्रिपद देण्याची मागणी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.