चाकण : जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका यांच्या वतीने उद्या (दि.२६ ) रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता परिसंवाद व भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चाकण शहराध्यक्ष राम गोरे यांनी दिली.
संभाव्य जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका यांच्या वतीने जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्या निमित्ताने कार्यकर्ता परिसंवाद आणि भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांची पुणे जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार केला जाणार आहे.
चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय,पुणे - नाशिक महामार्ग, चाकण येथे हा मेळावा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.