चाकण : युवकांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय करावा अश्या तरूणांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहु असे विचार जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी वासुली फाटा ( ता.खेड ) येथे सागर दुध डेअरी अॅन्ड स्वीटसच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख,खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य अमोल पवार,ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष काळूराम पिंजन,सरपंच कैलास गाळव, युवक नेते गणेश बोत्रे,उपसरपंच दिपक लिंभोरे,भाजप उपजिल्हाध्यक्ष संजय रौधळ,तालुका उपाध्यक्ष सुनिल देवकर,माजी आदर्श उपसरपंच सुरेश पिंगळे,युवक नेते साईनाथ पाचपुते, देवराम जाधव दत्ता पडवळ,नवनाथ पडवळ,संदीप बोत्रे,उद्योजक आबा सांडभोर,दत्ता लांडगे,दत्ता पानमंद,विजय घनवट, पोलीस पाटील अमोल पाचपुते,सागर बधाले आदी उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमधील वासुली फाटा येथे मोठी बाजारपेठ उदयास येत आहे.येथील मोक्याच्या ठिकाणी स्थानिक तरूणांनी विविध प्रकारचे व्यवसाय करावेत जेणेकरून कुटुंबाची प्रगती साधता येईल.असे बुट्टे पाटील यांनी सांगितले. अतुल देशमुख, अमोल पवार आदींनी आपले विचार व्यक्त केले.
सुनिल देवकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर अविनाश बधाले यांनी आभार मानले.