VOICE OF INDEPENDENT MEDIA

 Shooting
The Independent Voice

पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्याकडून विजयादशमीच्या शुभेच्छा

News Reporter   14-10-2021 23:48:52   220

पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्याकडून विजयादशमीच्या शुभेच्छा

वाघोली - शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी यांनी पुणे जिल्ह्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा दसरा आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील कोरोनाचे संकट तसेच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खटके यांनी जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी दसऱ्यानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रप्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस. असत्यावर सत्याने, अज्ञानावर ज्ञानाने विजय मिळवण्यासाठी कटीबद्ध होण्याचा दिवस. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्ताने राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. आपापसातील मतभेद, मनभेद, वादविवाद, भांडणतंटे विसरुन राज्यासमोरचे प्रत्येक आव्हान एकजुटीने, एकदिलाने परतवून लावण्याचा निर्धार करुया, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.


For News & Advertisements Contact Us.





 ADVERTISEMENT