आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, सत्तेसाठी भाजप काहीही करू शकते :: नगरसेवक गणेश ढोरे यांची टीका
पुणे: राज्यात आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षढयंत्र भाजप करतंय करत आहे. भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्या पाठोपाठ ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स येते.
सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी काहीही करू शकते याचा प्रत्येय आज आला आहे,
अजितदादा पवार हे स्पष्ट वक्ते नेते आहेत, मात्र भारतीय जनता पार्टीला काही करून सत्तेत यायचे आहे यासाठी भारतीय जनता पार्टी ईडी सीबीआयचा वापर करत आहे असा आरोप पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश ढोरे यांनी केला.
यावेळी ते म्हणाले की काही करा मात्र जनता हुशार आहे पुढच्या निवडणूक तुम्हाला हे दाखवून देईल असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.
आमचा कायद्यावर विश्वास आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांना असाच त्रास देण्यात आला, यांनाही न्याय मिळाला असल्याचे नगरसेवक ढोरे यांनी सांगितले.
'आमचे राष्ट्रवादीचे नेते निर्दोष आहेत, त्यांना बदनाम केलं जातंय. धाडसत्र चालवण्याचा या व्यवस्थेचा हेतू आहे.
या देशातल्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही! इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीचे मंत्री शेतकऱ्यांना गाडीखाली तुडवत आहेत यावर मात्र भारतीय जनता पार्टी काहीही बोलत नाही यावर किरीट सोमय्या बोलणार का असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.