VOICE OF INDEPENDENT MEDIA
  वाढदिवसाच्या शुभेच्छा

किशोरअप्पा पाटील - आमदार, पाचोरा

The Independent Voice  23-09-2018 14:54:12

किशोर धनसिंग पाटील ऊर्फ किशोर अप्पा पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. राजकारणात येण्याअगोदर त्यांनी सायकलवर भाजीपाला विक्री, ट्रकवर क्‍लिनरचे काम केले होते. नंतर ते पोलिस दलातही भरती झाले होते. शिवसेनेचे पाचोरा मतदार संघाचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांचे ते पुतणे आहेत. काकांच्या राजकारणाचा वसा घेऊन त्यांनी पोलिस कॉन्स्टेबलपदाचा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश केला. सन 2001 मध्ये ते पाचोरा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शिवसेनेने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा दिली. आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी जिल्ह्यात शिवसेना वाढविली. सन 2014 मध्ये पाचोरा विधानसभा मतदार संघातून ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. 2015 मध्ये जिल्हा बॅंकेत ते संचालक म्हणून निवडून आले, त्याच कालावधीत त्यांची जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीही झाली. पाचोरा पालिकेवरही त्यांचेच वर्चस्व आहे. त्यांच्या पत्नी सुनीता पाटील नगराध्यक्षा होत्या.

 जाहिराती